दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
उलवा/प्रतिनिधी,दि.३१- आज दिनांक 31/10/2025 दुपारी 16:30 ते 17:30 वा.चे दरम्यान जिओ टावर सेक्टर 5, या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
सदर दंगा काबू योजना रंगीत तालीम मध्ये उलवा पोलीस ठाणे कडील 1 पोनि, 04 सपोनि/ पोउपनिरी, 30 पोलीस अंमलदार, सिडको अग्निशामक विभागाकडील अग्निशामक वाहन त्यावर 01 अधिकारी आणि 05 कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर हॉस्पिटल येथील 01 रुग्णवाहिका व 02 कर्मचारी सहभागी झाले होते. सदरची दंगा काबू योजना शांततेत पार पडली आहे.
