पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेकडून भीम जयंती जल्लोषात साजरी

पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेकडून भीम जयंती जल्लोषात साजरी



पनवेल (प्रतिनिधी)- नवीन पनवेल येथील पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्यावतीने  भीम जयंती निमित्त १३,१४,१५ आणि १६ एप्रिल रोजी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.१३ एप्रिल रोजी भीम गीताचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला.रात्री बारा वाजल्या नंतर पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मेणबत्त्या लावून अभिवादन करण्यात आले. १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले.तसेच १५ एप्रिल रोजी झुंड हा चित्रपट दाखवण्यात आला.१६ एप्रिल रोजी स्थानिक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याचे पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या कार्यक्रमाला पंचशील नगर संस्थेचे उपाध्यक्ष अशोक आखाडे,सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, सदस्य संतोष ढोबळे,अजय दुबे,संतोष धोत्रे,संतोष जाधव आदीसह सर्व पदाधिकारी आणि नागरिकांचे सहकार्य लाभले.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image