क्रांतिज्योत महीला विकास फाऊंडेशन या संस्थेला सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान

क्रांतिज्योत महीला विकास फाऊंडेशन या संस्थेला सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान      

           


    

पनवेल : सोनिया महिला मंडळाच्या संकल्पनेतून उचलेल एक पाऊल "कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा " वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल याठिकाणी आज दि. 5 एप्रिल 2022 रोजी, दुपारी. 4 वाजता मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. यावेळी कोरोना काळात स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर्स, नर्स, समाजसेवक, पोलीस बांधव, पत्रकार बांधव आदींनी समाजसेवा केली त्यांच्या कार्याची दखल घेत सोनिया महिला मंडळाच्या वतीने "कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मुकेश म्युझिकल मेलोडी (हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा ) या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने ह्या सोहळ्याची शोभा वाढवली. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांच्या हक्कासाठी सतत लढा देत महिलांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य सातत्याने करणारी पनवेल मधील अग्रेसर क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनला ही सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष सौ. रूपालिताई शिंदे सह महिला पदाधिकारी यांनी हा मान स्वीकार करुन आभार व्यक्त केले. यावेळी फॉउंडेशन च्या पदाधिकारी सौ. रत्नमाला पाबरेकर, सौ.रेशमा सानप, सौ.अश्विनी पाटील, सौ. संगीता संगले, कु .शुभांगी पवार आदी सदस्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर यावेळी सोनिया महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुहासिनी केकाणे, उपाध्यक्ष सौ. अंजली इनामदार, सरचिटणीस सौ. नीता माळी, खजिनदार सौ. अस्मिता गोसावी, चिटणीस सौ. म्हात्रे, चिटणीस सौ. निता मंजुळे यांनी उत्तम सोहळ्याचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image