अंध मुलीला लॅपटॉप भेट

 अंध मुलीला लॅपटॉप भेट


पनवेल दि.०८ (वार्ताहर) : स्नेहकुंज आधारगृह, नेरे येथे अंध मुलगी निवेदिता प्रमोद कुडवळकर या मुलीला लॅपटॉप भेट देण्यात आला.

             नेरे येथील नितिन जोशी यांची या मुलीची कामोठे येथे एका कार्यक्रमात भेट झाली. हि मुलगी अंध आहे हे त्याना  माहीत नव्हते. तीचं सुंदर असे गाणे ऐकत असताना तीला बक्षीस देण्यात आले. त्यावेळेस तेथील निवेदकाने सांगितले कि ती अंध मुलगी आहे. यावेली जोशी हे तीच्या पालकांना भेटलो व काही मदत लागल्यास सांगा यावेली त्यानी सांगितले कि तीला लॅपटॉपची गरज आहे. ती आवाज ऐकून अभ्यास करेल असे तीच्या पालकांनी सांगीतले. हि गोष्ट जोशी यानी त्यांच्या मित्राना सांगितली, ते लगेच तयार झाले. व या मुलीला लॅपटॉप भेट देण्यात आला. लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिल टाऊन आणि स्नेहकुंज आधार गृह नेरे यांच्या वतीने तीला लॅपटॉप भेट देण्यात आला. या कार्यक्रमास मिलींद पाटील (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स), उमेश जाधव, हेमंत लोणकर, रेखा लोणकर, रमाकांत म्हात्रे (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टिल टाऊन ), संगीता म्हात्रे, प्रकाश घाडगे, संगीता जोशी (अध्यक्ष,  स्नेहकुंज आधार गृह), नितीन नाना जोशी उपस्थित होते.


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image