कामोठे येथे जेवणाच्या पैशावरून वाद झाल्याने एका कुटुंबावर १७ जणांचा जीवघेणा हल्ला.आरोपी अद्यापही फरार. घटना सीसीटीव्हीत कैद

कामोठे येथे जेवणाच्या पैशावरून वाद झाल्याने एका कुटुंबावर १७ जणांचा जीवघेणा हल्ला.आरोपी अद्यापही फरार. घटना सीसीटीव्हीत कैद


पनवेल / प्रतिनिधी : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील कामोठे शहरामध्ये दोन कुटुंबामध्ये जेवणाच्या पैशावरून वाद झाल्याने एका कुटुंबावर १७ जणांनी  जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दिनांक २६/०३/२०२२ रोजी कामोठे गावातील म्हात्रे कुटुंबातील सदस्य त्यामध्ये संदीप नागनाथ म्हात्रे, निलेश नागनाथ म्हात्रे, विजय तुलशीराम म्हात्रे तसेच इतर १५० सदस्य कुलदैवत जेजुरी या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनादरम्यान जेजुरी येथे म्हात्रे परिवारामध्ये जेवणाचे कारणावरून किरकोळ भांडण झाले होते मात्र सदरचे भांडण संपुर्ण म्हात्रे परिवाराने एकत्र बसुन आपआपसामध्ये मिटवले होते. तसेच दिनांक ३१/०३/२०२२ रोजी देवदर्शनाचा हिशोब करून भावकीतील लोक एकत्र बसुन झालेल्या भांडणाचा विषय संपवुन टाकु असे ठरले होते. मात्र प्रशांत म्हात्रे याला म्हात्रे कुटुंबातील १) संदिप नागनाथ म्हात्रे २) प्रविण सखाराम म्हात्रे ३) निलेश नागनाथ म्हात्रे ४) विजय तुलशीराम म्हात्रे ५) महेश एकनाथ म्हात्रे ६)  स्वप्निल राजेश म्हात्रे ७) जयवर्धन तुलशीराम म्हात्रे ८) संजय सखाराम म्हात्रे ९) शांताराम बंडू म्हात्रे १०) प्रभाकर तुळशीराम म्हात्रे च इतर ७ अनोळखी पुरुष व महिला यांनी त्याठिकाणी येऊन लाकडी बांबु व लोखंडी रॉडने मारण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील मालिका वामन म्हात्रे, प्रशांतचे वडील गजानन हरिशचंद्र म्हात्रे, त्यांची वृध्द आई नामे गोमुबाई हरिषचंद्र म्हात्रे, विदया गजानन म्हात्रे, श्वेता प्रशांत म्हात्रे तसेच चुलत भाउ नामे हिरामन हरिशचंद्र म्हात्रे असे बिल्डिंगचे खाली आले व प्रशांत यास मारू नका, या अगोदर जे भांडण झाले आहेत त्याबाबत आपण मिटींग घेउन विषय संपवू असे सांगू लागले. मात्र  त्यावेळी १) संदिप नागनाथ म्हात्रे २) प्रविण सखाराम म्हात्रे ३) निलेश नागनाथ म्हात्रे ४) विजय तुलशीराम म्हात्रे ५) महेश एकनाथ म्हात्रे ६)  स्वप्निल राजेश म्हात्रे ७) जयवर्धन तुलशीराम म्हात्रे ८) संजय सखाराम म्हात्रे ९) शांताराम बंडू म्हात्रे १०) प्रभाकर तुळशीराम म्हात्रे च इतर ७ अनोळखी पुरुष व महिला यांनी जेजुरी देवस्थान येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून प्रशांत व घरातील जेष्ठ महिला तसेच महिलांना देखील बांबू आणि रॉडने मारहाण करून दुखापत केली तसेच प्रशांत म्हात्रे हा फार गंभीर अवस्थेत असल्या कारणास्तव त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना मितेश मोहन गोंधळी याचे मालकीची हुंडाई एक्सेंट गाडी क्र. एमएच. ४६.ए. एल. ८९२२ या गाडीचे काचा फोडुन  फार मोठे नुकसान केली व ते निघुन गेले. याबाबत तक्रारदार यांनी कामोठे पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दाखल केली असून आरोपींविरोधात गुन्हादाखल झाला असून आरोपी अद्यापही फरार आहेत. तरी या आरोपींविरोधात भादवी १८६० नुसार ३०७,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९,३२३,४२७,५०४,३७(१), ३, १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामोठे पोलीस करत आहे. दरम्यान आरोपीना लवकरात लवकर पकडून त्यांना कडक शासन करावे अशी मागणी प्रशांत म्हात्रे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. वयोवृद्ध महिलेला व इतर महिलांना मारहाण केली असता आज  महिला सुरक्षित नाहीत हे दिसून येत आहे , भर रस्त्यात गावगुंडांचा सारखे मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रकार हा कामोठे गावामध्ये घडला  असून येथील म्हात्रे कुटुंब व महीला वर्ग न्याय मिळावा यासाठी विनंती करत आहेत.