लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील येथे अॕकॅडेमिक विजीट

 लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील येथे अॕकॅडेमिक विजीट


नवीन पनवेल : लोकमान्य टिळक लॉ कॉलेज यांनी एलएलबी आणि बीएएलएलबी या विद्यार्थ्यांसाठी पनवेल तहसील कार्यालयाला अकॅडमिक विजीट आयोजित केली होती. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

         पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयात ही पहिलीच भेट होती. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारले. यावेळी न्यायालयीन अधिकार काय असतात, महसूल संबंधातील नियम काय असतात तसेच सातबारा, आठ अ, फेरफार विषयीची माहिती, तहसीलदार विजय तळेकर यांनी लॉच्या विद्यार्थ्यांना दिली. तहसीलदार संजीव मांडे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image