शांतादेवी यात्रा
गव्हाण पंचक्रोशीतील गव्हाण, कोपर, शिवाजीनगर आणि शेलघर या चार गावांची ग्रामदेवता असलेल्या शांतादेवीची(देवी संतुबाय) दोन दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीधरशेठ ठाकूर, उपसरपंच विजय घरत, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, साईचरण म्हात्रे, किशोर पाटील यांच्यासह हजारो ग्रामस्थांनी शांतादेवीचे दर्शन घेतले.