अबब !!! पनवेलमध्येही कत्तलखाना आहे; गुरांची अवैध कत्तल करताना छापा- पोलिसांमार्फत कारवाई दरम्यान ओवेतील एकजण ताब्यात तर तळोजातील एकजण फरार

अबब !!! पनवेलमध्येही कत्तलखाना आहे; गुरांची अवैध कत्तल करताना छापा- पोलिसांमार्फत कारवाई दरम्यान ओवेतील एकजण ताब्यात तर तळोजातील एकजण फरार 


तळोजातील कब्रस्तानच्या पाठीमागे सुरु होता हा अवैध कत्तलखाना 

कारवाईमध्ये तब्बल ९० हजारांचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत 


पनवेल : राज भंडारी 

देशात गोवंश हत्या करण्यावर बंदी असतानाही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गो हत्या केली जात आहे, असाच प्रकार शुक्रवारी तळोजा कब्रस्तानच्या मागील बाजूच्या परिसरात घडला असताना पोलिसांनी छापा टाकत खारघर ओवे येथील एक जणाला रंगेहात ताब्यात घेतले, तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. याबाबत तळोजा पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 

तळोजा येथील कब्रस्तानाच्या पाठीमागील बाजूस गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल केली जात होती. सदर माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील होलार, पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक ०१ एप्रिल रोजी आपल्या पथकासह घटनास्थळी छापा मारला असता येथे प्रतिबंधित असलेल्या गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करताना आरोपी मिळून आले. 

यातील आरोपी यांनी मांस विक्री करण्याच्या हेतूने सदर कृत्य करीत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी तब्बल ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये गोवंश जातीचे प्राणी गाय आणि बैल, तसेच लोखंडी तराजू आणि कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामानाचा समावेश आहे. याबाबत तळोजा पोलिसांनी खारघर येथील ओवे गावातील इम्रान अब्दुल अजीज पटेल यास अटक केली असून तळोजातील अन्य एक आरोपी फरार आहे. याबाबत तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image