"एकच ध्यास.. घारापुरीचा विकास !"-घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना मोठे यश !

"एकच ध्यास.. घारापुरीचा विकास !"-घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना मोठे यश !




उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील 
घारापुरी येथील लेण्यांच्या देखभालीसाठी एस.आय .एस या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड तैनात आहेत.मात्र सदरचे सर्व सिक्युरिटी गार्ड हे परप्रांतीय असल्याने घारापुरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर घेण्याचा आग्रह ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी कंपनीकडे केला होता.
त्याप्रमाणे सन 2018 पासुन भारतीय पुरातत्त्व विभाग व एस.आय.एस.सिक्युरिटी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्याप्रमाणे सदरच्या कंपनीने सुरूवातीला तीन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर रुजू करून घेतले असून लवकरच प्रलंबित असलेल्या अर्जदारांनाही नोकरीची संधी मिळणार आहे.सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती करण्यासाठी योग्य ते सहकार्य राजिप सदस्य विजय भोईर यांनी केले.स्थानिक भूमीपुत्रांना सेक्युरिटी गार्ड म्हणून रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढेही उपलब्ध होणार असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी, ग्रामस्थांनी सरपंच बळीराम ठाकूर, घारापुरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहे. स्थानिक भूमीपुत्रांना आहे त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरपंच बळीराम ठाकूर यांनी निर्धार केला असून त्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image