पेट्रोलचे शंभर रुपये मागितल्याने लाकडी दांडक्याने केली मारहाण

पेट्रोलचे शंभर रुपये मागितल्याने लाकडी दांडक्याने केली मारहाण


नवीन पनवेल : पेट्रोल भरलेले शंभर रुपये मागितले असता त्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना किरवली पेट्रोल पंपावर घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          9 एप्रिल रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास दोन इसम डिओ स्कुटी क्रमांक एम एच 46 बीसी 3433 वरून पेट्रोल भरण्याकरता आले होते. त्यांनी गाडीमध्ये 100 रुपयाचे पेट्रोल भरले. त्यानंतर हरिकेश यादव याने पेट्रोलचे पैसे मागितले, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला व शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनतर ते स्कुटी घेऊन पळून जात असताना यादव यांनी त्यांची स्कुटी पकडून ठेवली. त्यानंतर स्कुटी पेट्रोल पंपावर सोडून तुला दाखवतो असे बोलून ते त्या ठिकाणाहून पळून गेले. काही वेळाने दोन्ही ईसम बाराच्या सुमारास त्यांच्यासोबत इतर पाच इसम व एक महिला घेऊन आले. त्यांनी यादव यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हरिकेश यादव हा पळून त्यांच्या ऑफिसमध्ये गेला. त्यानंतर सात इसम व एक महिला असे त्याच्या रूमकडे गेले व रूमच्या बाहेर असलेला बच्चन यादव यास देखील मारहाण केली व ते पळून गेले. यात बच्चन यादव हा जखमी झाला आहे. त्याच्यावर साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उत्तरशिव येथे उपचार सुरू आहेत.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image