"ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ " काव्य मैफिलीद्वारे होणार मराठी नववर्ष साजरे-'रसिक हो..प्रस्तुति' संस्थेचा आगळावेगळा उपक्रम

"ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ " काव्य मैफिलीद्वारे होणार मराठी नववर्ष साजरे-'रसिक हो..प्रस्तुति' संस्थेचा आगळावेगळा उपक्रम


चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्माने सार्‍या जगाची निर्मिती केली. पुढे चालून याच परंपरेनुसार येथील आर्यजनांचे नवसंवत्सर चैत्र प्रतिपदेला प्रारंभ झाले. त्याचबरोबर ब्रह्मादिन, सृष्टिसंवत्, वैवस्वत आदी मन्वंतरआरंभ, सत्युगादी युगारंभ, कलिसंवत्, विक्रमसंवत् हे सर्व चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होतात. याच दिनी सर्वत्र निसर्ग परिवर्तनाच्या छटा दिसून येतात. अशा चैतन्यमय दिवसाचे स्वागत करण्याकरता पनवेलच्या 'रसिकहो...प्रस्तुति' या संस्थेच्या वतीने आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील ज्येष्ठ कविवर्य यांच्या ऑनलाइन काव्यमैफलीच्या माध्यमातून "ज्येष्ठ..सर्वश्रेष्ठ " काव्य मैफिलीद्वारे नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

       अलवार शब्दांच्या भावविश्वात शिरून संवेदनशील काव्यरचना करणारे सुप्रसिद्ध कवी,गीतकार आशिष चौबळ यांच्या संकल्पनेतून उभारलेली रसिकहो...प्रस्तुती ही संस्था पनवेल येथून साहित्यविश्वात निरनिराळे उपक्रम साजरे करत असते. भारतभूमीच्या सीमा ओलांडत, थेट अमेरिकेतून काही कविवर्यही या मैफलीमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते.संपदा देशपांडे,सानिका पत्की या संस्थेच्या सदस्यांनी कवितांची निवड केलेली असून त्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पाहत आहेत. तर रसिकहो प्रस्तुती या संस्थेचे सदस्य पत्रकार मंदार दोंदे हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

‌या काव्यमैफिलीत ज्येष्ठ कवी, अजितजी महाडकर , मोहनाताई टिपणीस , प्रदिप राजे, गझलकार अभयजी कारखानीस , विजय(नाना) फडणीस या सारख्या दिग्गज कवींना साथ देणासाठी ऊत्तमोत्तम वैविध्यपूर्ण कवितांचं तोरण बांधायला येत आहेत ज्येष्ठ कवी मंडळी, अलका वढावकर , आरती दळवी ,सुनिल चिटणीस , वैजयंती गुप्ते , वैशाली कुळकर्णी , मृदुला राजे , सुरेश दिघे,  अरुणा मुल्हेरकर , आशाताई दोंदे.

       रसिकहो प्रस्तुती या संस्थेच्या वतीने आयोजित सदर काव्य संमेलनाचा आनंद घ्यायचा असेल तर https://meet.google.com/azn-uuec-guq या गुगल मीट च्या लिंक वर 2 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता क्लिक करुन रसिक प्रेक्षक सहभागी होऊ शकतात असे संस्थेचे सर्वेसर्वा अशिष चौबळ यांनी सांगितले. रसिकहो... प्रस्तुती या संस्थेच्या वतीने यापूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीतून काव्य पुष्पमाला कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image