पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा


पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पनवेल महापालिका हद्दीतील तळोजे मजकुर येथे असलेल्या नाल्याला पावसाळ्यात मोठा प्रवाह असतो. त्यामुळे या नाल्याचे काम न झाल्यास नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या नाल्याची आणि तसेच रस्त्यांच्या कामाची अधिकार्‍यांसह पाहणी केली व त्यांना सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक हरश केणी, भाजप नेते निर्दोश केणी, दिनेश केणी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image