पनवेल तालुक्यात शेकापला आणखी एक हादरा; जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल तालुक्यात शेकापला आणखी एक हादरा; जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, शेखर कानडे करणार भाजपमध्ये प्रवेश 



पनवेल(प्रतिनिधी) तालुक्यातील केळवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत तसेच आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, खलील पटेल, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे व त्यांचे असंख्य सहकारी शुक्रवार दिनांक १५ एप्रिलला सायंकाळी ०७ वाजता भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश करणार असून शेकापक्षाला तालुक्यात आणखी एक मोठा हादरा बसणार आहे. 
           आपटा गावातील मैदानावर हा सोहळा होणार असून पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image