खारघर,सेक्टर-१५ घरकुल काँम्पलेक्समध्ये डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

खारघर,सेक्टर-१५ घरकुल काँम्पलेक्समध्ये डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी  


       

खारघर (प्रतिनिधी)-खारघर,सेक्टर-१५ घरकुल काँम्पलेक्समध्ये डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली.तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ गेली वीस वर्षे क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरी करीत असतात.बुधवार दिनांक १३ एप्रिल रोजी आयु.एकनाथ ढंगारे यांचे,"आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नव्हे" आणि आयु.अॕडव्होकेट जे.पी.खारगे यांचे "डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आणि बंधुत्त्व"या विषयांवरती व्याख्याने आयोजित केली होती.ही व्याख्याने ऐकण्यांसाठी मंडप गर्दीने तुडूंब भरला होता.                    

         १४ एप्रिल या बाबासाहेबांच्या १३१ व्या जयंती दिवशी १३१ वृक्षांचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी अनेक कार्यकर्ते,महिला-पुरूष,अबालवृद्ध आणि परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.    सायंकाळी ६ ते रात्री १० बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक घरकुल मुख्य प्रवेशद्वार,हनुमान तलाव,स्पॕघेटी,वास्तुविहार,सेक्टर-१८ वरून डी-मार्ट समोरून स्वर्णगंगा ज्वेलर्स ते घरकुल मुख्य प्रवेशद्वार अशी काढण्यात आली.या मिरवणूकीत शेकडो अनुयायांनी सहभाग घेतला.मिरवणूकीत आनंदाने सर्वांनी भीमगीतांच्या तालावर ठेका धरला होता.                                                   

        शुक्रवार दीनांक १५ एप्रिल रोजी मंडळाने दंतचिकित्सा आणि आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.या शिबीराचा अनेक गरीब- गरजू लोकांनी लाभ घेतला.सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रबोधनपर वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाने भीम-जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.                 

      तीन दीवसांचा हा भव्य-दिव्य जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी हौसींग सोसायटीचे अध्यक्ष प्रविण कदम,उत्सव कमिटी अध्यक्ष सुरेश वाघमारे, प्रमुख तरुण कार्यकर्ता तुषार गायकवाड, पदाधिकारी दादाराव आठवले, सीताराम हरकुळकर , महेंद्र सोनावणे, हिरामण थोरात,  किसन वाहुळे, सुशीलकुमार बनसोडे, राजेंद्र गायकवाड, साहिल पाटणे, तेजस वाघमारे, ऋतिक मोरे, गौरव मोरे, शांतनू कदम, सोहम कदम, आविष्कार वाघमारे यांचे अमूल्य असे योगदान लाभले.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image