जालना येथे तपस्वी नंदकुमार गोंधळी यांचा हिरकणी पुरस्काराने सन्मान.......

जालना येथे तपस्वी नंदकुमार गोंधळी यांचा हिरकणी पुरस्काराने सन्मान.......


जालना शहरातील टाऊन हॉल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सा. हिरकणीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हिरकणी पुरस्काराने महाराष्ट्रातील दहा कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक शिवरतन मुदंडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कैलाश सचदेव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष ऍड. अश्विनी धन्नावत,  साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या मुख्य संपादक करुणा अच्युत मोरे, कार्यकारी संपादक सातारा विद्या निकाळजे, कार्यकारी संपादक मुंबई व नवी मुंबई संगीता ढेरे, रोटरी क्लबचे ॲड महेश धन्नावत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हिरकणीचा इतिहास सर्वांना माहीत आहे त्यामुळे हिरकणी नाव घेतल्यानंतर डोळ्यासमोर उभा राहतो तो गड आणि गडावरून खाली उतरणारी हिरकणी अशा शुर आणि निर्भय असलेल्या हिरकणी सारखे काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने होणारा गुणगौरव हा सर्व स्त्री वर्गाचा अभिमान आहे त्यामुळे कर्तबगार आणि शूर हिरकणी घरा-घरात जन्माला यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक शिवरतन मुदंडा यांनी केले तर संपादक करुणा मोरे यांनी साप्ताहिक हिरकणीच्या माध्यमातून राज्यभरात सुमारे 45 हजाराहून अधिक महिलांचे संघटन निर्माण केले आहे असे सांगितले. हिरकणी महोत्सव आणि हिरकणी पुरस्कार वितरण सोहळ्यात तपस्वी नंदकुमार गोंधळी - रायगड, सलमान शेख- हिंगोली पोलीस कॉन्स्टेबल, नालंदा लांडगे- सहाय्यक पोलीस निरीक्षक औरंगाबाद, रंजना सानप- सातारा, शारदा लव्हाळे- कोल्हापूर, सुमनताई तोरणे- रायगड, कुसुम सोळंके - जालना, शैला खाडे- रायगड, सारिका शिरसागर- लातूर, वैष्णवी सोळंके - जालना यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर सह विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच शिवशाहीर रामानंद उगले यांचा महिलांसाठीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी पार पडला.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image