कोकण विभागात 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर

 कोंकण विभागात एस.टी. सेवा पूर्ववत

कोकण विभागात  4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर



नवीमुंबई दि.18:कोकण विभगातील  ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक  एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे.  अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली.

          २८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्निागरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716  कर्मचारी संपसोडून कमावर हजर झाले आहेत.

कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले असल्याचे कोकण विभागाचे माहिती उपसंचालक मा.गणेश मुळे यांनी सांगीतले.


--

             

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image