मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई,भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या


मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई,भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या


*सोनेव्यापाऱ्याची उलाढाल तीन वर्षात*

  *23 कोटींवरुन 1764 कोटी रुपयांवर*

*संशयास्पद व्यवहार जीएसटीच्या रडारवर*


मुंबई, दि. 22 :- मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या  35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 13 लाख रुपये किंमतीच्या 19 लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी  शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image