आयपीएल सामन्यांच्या वेळी वाहतुक नियोजनाकरिता पार्कींग स्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी एनएमएमटी बससुविधा

आयपीएल सामन्यांच्या वेळी वाहतुक नियोजनाकरिता पार्कींग स्थळापर्यंत ये-जा करण्यासाठी एनएमएमटी बससुविधा


          नवी मुंबईतील डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम येथे दि. 27 मार्च ते 22 मे 2022 या कालावधीत इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचे साधारणत: 20 सामने होणार असून यानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. यादृष्टीने नवी मुंबईतील वाहतुकीचे नियोजन वाहतुक पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असून पार्कीगची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत.
          या पार्कींग ठिकाणांपासून प्रेक्षकांना डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियमपर्यंत घेऊन जाण्यासाठी व सामना संपल्यानंतर पार्कींग स्थळापर्यंत पोहचण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या एन.एम.एम.टी. बसेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रहेजा युनिव्हर्सल, माईंड स्पेस, वंडर्स पार्क, नेरूळ रेल्वे स्टेशन, पुण्यनगरी कार्यालयाजवळील पादचारी पूल, डि.वाय.पाटील बसस्टॉप व उरण फाटा या ठिकाणी या बसेसचे नियोजन करण्यात आलेले असून ही सेवा सशुल्क असणार आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image