गव्हाण विभाग मनसे तर्फे अंगणवाडी सेविकांचा सत्कार.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )
जागतिक महिला दिना निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गव्हाण विभागाच्या वतीने उलवे नोड मधील अंगणवाडी सेविकांचा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि तुळसी रोप देवुन सत्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी,गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनिल म्हात्रे ,उलवे शहर उपाध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख ,शाखा अध्यक्ष उलवे नोड अरूण म्हात्रे,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उलवे शहर अध्यक्ष मयूर यशवंत घरत , अमित पाटील , अशोक वडांगले,राजेश परमेश्वर आदि पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.