छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेण्यासाठी सरसावल्या बचतगटाच्या महिला

                                                       

छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेण्यासाठी सरसावल्या बचतगटाच्या महिला



     *अलिबाग,दि.24(जिमाका):-* महिला आर्थिक विकास महामंडळ, रायगड तसेच युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने दि.21 मार्च 2022 रोजी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेतील ज्या महिलांचे कोरोना कालावधीत उद्योग व्यवसाय बंद झाले किंवा ज्यांना नव्याने घरगुती व्यवसाय चालू करणे आहे किंवा टेलरिंग येते पण मशीन घेऊ शकत नाही अशा एकूण 94 महिलांना नुकतेच त्यांना छोट्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेता यावी यासाठी वस्तू रुपात साहित्य वाटप करण्यात आले.

     त्यातील 47 महिलांना शिलाई मशीन, 20 महिलांना घरघंटी, 12 महिलांना ब्युटी पार्लर किट, 1 महिलांना केक तयार करण्याचे किट तसेच 14 महिलांना फूड सर्व्हिसचे किट असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्याकडून ही या महिला बचतगटातील महिलांचा पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून या किट किंवा या मदतीमुळे त्यांना कसा फायदा झाला किंवा होत आहे हे माहीत करून घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

     या किट वाटप कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गावडे, सहायक आयुक्त श्री.विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा पाटील, युनायटेड वे मुंबई फाउंडेशनचे पदाधिकारी श्री.संदेश पवार, जिल्ह्यातील लेखाधिकारी माधुरी देवीकर, एम आय एस अधिकारी दीपक पोटभरे, पनवेल nulm च्या SMID म्हात्रे, श्री.थोरात, नवी मुंबई nulm SMID चे तुषार पवार तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्र समन्वयक रुपाली मोहिते, राकेश कांबळे, रेखा साळवी व बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image