९ लाभार्थ्यांना १ लाख ८० हजाराचे धनादेश तहसीलदार, विजय तळेकर यांच्या हस्ते वाटप
नवीन पनवेल : तहसिलदार कार्यालय पनवेल, येथे दिनांक ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनांबाबत एकनाथ विष्णू नाईक, (नायब तहसिलदार, संजय गांधी योजना), यांनी योजनांची माहीती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.