शब्दशिल्प कलाविष्कार संघ समूहात मराठी भाषा दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध साहित्य संपदेला उजाळा देत उत्साहात संपन्न
पोयनाड(सचिन पाटील)शब्दशिल्प कलाविष्कार संघ नोंदणीकृत साहित्यिक समूहात दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी अस्मिता जपणारा मराठी भाषा दिन थाटामाटात संपन्न झाला. मराठी साहित्याची व्याप्ती खुलवली ती कुसुमाग्रजांसारखे अनेक दिग्गज होऊन गेले. २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांची जयंती. त्या प्रित्यर्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो. शब्दशिल्प कलाविष्कार संघात दिवंगत सुप्रसिद्ध पाच साहित्यिक कुसुमाग्रज/वि. वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, पु. ल. देशपांडे, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके ह्या साहित्यिकांची अजरामर असणारी साहित्य संपदा, त्याला उजाळा देत त्या साहित्यिकांच्या साहित्याचे काव्यवाचन, अभिवाचन, संवाद पठण करणारे आवडीने चित्रफीत बनवून समूहाच्या युट्यूब वाहिनीचा प्रथमेशा करून मानवंदना देण्याचा प्रयत्न मराठीदिनानिमित्त केला. अध्यक्षा सौ. अलका वसंत येवलेंनी मनोगतात सांगितले की नवोदीत साहित्यिकांनी प्रख्यात साहित्यिक साहित्य हाताळले तर त्यांच्या लिखाणाचा दर्जा आणिक उंचावेल. कार्याध्यक्ष गीतांजली वाणींच्या दृष्टीकोनातून आपल्या साहित्याला संस्कृती समजून जोपासल्याने ज्येष्ठ साहित्यिक योगदान सार्थकी लागेल. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवयित्री सुशीला पिंपरीकर, मातृभाषा पोवारी असणारे मराठी साहित्यिक गोवर्धन बिसेन, तळागाळातील लोकांपर्यंत साहित्य पोहचवण्यासाठी धडपडणारे ज्ञानेश्वर शिंदे आणि चंदन तरवडे होते. समारंभाच सुमधूर आवाजात निवेदन सपना भामरे व अर्चना नावरकर यांनी केले. समूहात मराठी दिन आभासी पध्दतीने चित्रफीत दाखवून आयोजन मयूर पालकर, उषा देव, अनिता दशपुते, विद्या नेरकर, रजनी येवले यांनी केले होते. समारंभात परदेशातून सरला सोनजे व स्मिता भीमनवार यांनी सहभाग नोंदवून समारंभास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. समारंभाचे आकर्षक आभासी निमंत्रण प्रमोद सुर्यवंशींनी बनविले. दिग्गज साहित्यिक संपदेला शब्दशिल्प कलाविष्कार संघाने मराठी भाषा दिनानिमित्त आगळीवेगळी मानवंदना दिली.