महाड,रोहा व पोलादपूर तालुक्यात लोककलापथकांनी जागविला विकास कामांचा जागर

                                           

महाड,रोहा व पोलादपूर तालुक्यात लोककलापथकांनी जागविला विकास कामांचा जागर


*अलिबाग,दि.11(जिमाका):*  ढोलकीवर पडणारी थाप आणि त्यापाठोपाठ ‘दोन वर्षे अभिमानाची… दोन वर्षे जनसेवेची… आपल्या महाराष्ट्र शासनाची’ हे शब्द कानी पडताच जमलेली गर्दी अन् कलापथकाच्या तरुण कलाकारांना मिळणारा प्रतिसाद असेच चित्र आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिसत होते.      निमित्त होते...राज्य शासनाच्या विविध योजना पोचविण्यासाठी राबविलेल्या लोककलांच्या माध्यमातून जागर मोहिमेचे…

     राज्य शासनच्या गेल्या दोन वर्षातील विविध विकासकामे, राबविलेल्या उपक्रम याबरोबरच जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्यासाठी ‘लोककलेच्या माध्यमातून विकासाचा जागर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी तीन लोककला पथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेस दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे.

     आज दिवसभरात महाडमधील शिवाजी चौक, महाड बस स्टँड, चवदार तळे परिसर, सुकट गल्ली, पोलादपूर बस स्टँड, पोलादपूर तहसील कार्यालय, रोहा तालुक्यातील रोहा बस स्थानक, सानेगाव, शेणवई व यशवंतखार या गावांमध्ये लोककलापथकांनी सादरीकरण केले. 

      या सादरीकरणाच्या वेळेस नागरिकांबरोबरच पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई, पत्रकार शैलेश पालकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, मान्यवर व्यक्तीही आवर्जून उपस्थित राहून कलापथकांच्या सादरीकरणास दाद देताना दिसत  आहेत.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image