लीग सामन्यांव्दारे नवी मुंबई महापालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी


 

लीग सामन्यांव्दारे  नवी मुंबई  महापालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

 


      नवी मुंबई महानगरपालिका विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द राहून काम करीत आहे.  महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासासाठी विविध क्रीडा स्पर्धांना नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. यावर्षी आशियाई महिला चषक फुटबॉल स्पर्धा 2022 या स्पर्धेचे यजनमानपद नवी मुंबई शहराला प्राप्त झाले होते. त्याचे औचित्य साधून फुटबॉल या खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पावले उचलण्यात आली आहेत.

   या अनुषंगाने 23 ते 25 नोव्हेंबर 2021 दरम्यान महापालिकेतील 27 शिक्षकांना फुटबॉल विषयक प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाकरिता ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षक उपलब्ध झाले. महानगरपालिकेचा क्रीडा विभाग व शिक्षण विभाग तसेच ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 12 व नवी मुंबई क्षेत्रातील 12 महिला शिक्षक अशा मिळून 24 महिलांसाठी फुटबॉल कोचींग सुविधेची AIFF E License Course चे आयोजन माहे डिसेंबरमध्ये करण्यात आले होते. यामध्ये विशेष बाब म्हणजे सदर कोर्स महिला शिक्षकांसाठी उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.

   दि. 20 जानेवारी ते दि. 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या मध्ये आशियाई महिला चषक फुटबॉल स्पर्धा 2022 महापालिकेतील 45 ते 50 विदयार्थींना प्रत्यक्ष पाहण्याची संधी महापालिकेच्या क्रीडा विभाग व शिक्षण विभाग यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.

विदयार्थ्यांमध्ये विशेष करुन मुलींमध्ये फुटबॉल या खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने महापालिकेमार्फत फुटबॉल प्रिमियर लीiचे आयोजन करण्यात आले आहे. फुटबॉल प्रिमियर लीगसाठी नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधून प्रति विभाग 1 प्रमाणे विभागनिहाय एकूण 10 संघाची निवड करण्यात आली आहे. या 10 संघात साधारणत: 70 विद्यार्थिनींचा समावेश आहे.

फुटबॉल प्रिमियर लीगसाठी निवड करण्यात आलेल्या संघाना ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनमार्फत सरावाकरिता प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले होते. दि. 02 ते 04 मार्च 2022 या कालावधीमध्ये लीगचे आयोजन करण्यात आलेले असून 10 संघांतील प्रत्येक संघास 4 सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती.

लीग सामन्यातील कामगिरीनुसार ऐरोली विभाग, सानपाडा विभाग, रबाळे विभाग व कोपरखैरणे विभाग उपांत्य फेरीत पात्र झाले असून अंतिम उपात्य व अंतिम सामने महानगरपालिकेने निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  यशवंतराव चव्हाण मैदानात खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धांमुळे विद्यार्थिनींचे मनोबल उंचाविण्यास मदत झालेली आहे.


Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image