पुणे येथे होणाऱ्या १५ ते १७ एप्रिल मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधत्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, ऋषिकेश म्हात्रे आणि दिपक राऊळ या तीन बॉडी बिल्डर्सना प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागचे नाव आंतराष्ट्रीय स्थरावर पोहचले आसल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसे लेखी पत्र बॉ.बी. अॅण्ड फि. असो. रायगड ऑरगनायझर सेकेटरी-महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो.जनरल सेक्रेटरी दिनेश शेळके यांनी पाठविले आहे.
महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन, महाराष्ट्र, क्रिडा परिषद महाराष्ट्र राज्य मान्यनाप्राप्त बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसीएशन,
इंडियन बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस फेडरेशन तर्फे मिस्टर युनिव्हर्स मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागात राहणारे व घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्वताला सिध्द करीत जयेंद्र मयेकर यांनी चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला आसून एक वेळा मिस्टर आशिया हा किताबही मिळविलेला आहे. आज पर्यंत त्यांनी विविध प्रकारचे २२ किताब पटकाविले आहेत. श्री. मयेकर हे जिल्ह्यातील अनेक युवकांना शरीशौष्ठव स्पर्धेसाठी तयार करण्याचे काम करीत आहेत.