आगरी बोलीत अधिक लेखन करण्याची गरज -प्रा.एल.बी.पाटील
नवीन पनवेल : आगरी बोलीतील कवी लेखकांनी समाजातील वाईट प्रथा आणि व्यथांवर अधिक लेखन करण्याची गरज आहे, असे मत रायगड भूषण प्रा.एल.बी पाटील यांनी मांडले. ते अखिल भारतीय आगरी संघटनेने आयोजित केलेल्या पतंगराव महाविद्यालयात कवी
सम्मेलनात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सूर्यकांत पाटील होते. यशवंत घासे प्राचार्य धिंदले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी काव्यस्पर्धेचे परीक्षण म. वा म्हात्रे, डॉ. अवी पाटील, मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले. शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत अशोक मढवी (प्रथम), जगदिश पाटील, गणेश म्हात्रे (द्वितीय), प्रभाकर म्हात्रे (त्रुतीय) आणि उत्तेजनार्थ के.पी पाटील, शरद पाटील, अजय भोईर, रमेश पाटील,यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.