वक्तृत्व स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर ज्यु. कॉलेजच्या भूमी चिबडे हिचे घवघवीत यश

वक्तृत्व स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर ज्यु. कॉलेजच्या भूमी चिबडे हिचे घवघवीत यश



पनवेल(प्रतिनिधी) सुधागड शिक्षण संकुलात स्व.शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर ज्यु. कॉलेजच्या कु. भूमी चिबडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. चषक व रोख रक्कम असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. महाविद्यालयीन गटातून झालेल्या या स्पर्धेत ‘बदलते निसर्गचक्र’ या विषयावर भूमीने विचार मांडलेलेे होते. महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडला. खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौंसिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्कुल कमिटी चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी  भूमी चिबडे हिचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image