पनवेल-मुंब्रा महामार्गावरील खिडूकपाडा गावाजवळील क्राॕसींग बंद केल्यास आंदोलन करू-प्रभाकर उलवेकर

पनवेल-मुंब्रा महामार्गावरील खिडूकपाडा गावाजवळील क्राॕसींग बंद केल्यास आंदोलन करू-प्रभाकर उलवेकर   



कळंबोली (प्रतिनिधी)-बेंगलोर-मुंबई, जुन्या  NH-4 राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल-मुंब्रा या विभागात कळंबोलीजवळ खिडूकपाडा हे गांव असून या महामार्गावरून गावांत येण्या-जाण्यासाठी १०० वर्षापूर्वीपासून रस्ता क्राॕसींग आहे.रस्ते अपघाताचे कारण देत प्रशासन हे क्राॕसींग बंद करू इच्छित आहे.हे कारण योग्य असले तरी खिडूकपाडा गावांत राहणाऱ्या ८ ते १० हजार नागरिकांचा विचार केल्यास हे क्राॕसींग  बंद करणे योग्य ठरणार नाही.कारण खिडूकपाडा गावांत शाळा किंवा हास्पिटल्स नसल्यामुळे येथील सर्व नागरिकांना या क्राॕसींगचा उपयोग करूनच कळंबोलीला यावे-जावे लागते किंवा ते सोयीचे आहे.अशा परिस्थितीत हे क्राॕसींग बंद केल्यास येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना बीमा काँम्पलेक्सवरून कळंबोली शहरात जावे लागेल.यामुळे हजारो अबाल-वृद्धांच्या वेळेचा अपव्यय होईल तसेच महामार्गावरती आमचा बस थांबा असून ही आमच्या गावाची ओळख आहे.तरी आम्हांला उड्डाण पूल किंवा अंडर पास बनवून पर्यायी व्यवस्था निर्माण करावी.             या सर्व बाबींचा विचार न करता प्रशासनाने हे क्राॕसींग बंद करण्याचा प्रयत्न केल्यास खिडूकपाडावासी स्वस्थ बसणार नाहीत.तर आम्ही चक्काजाम आंदोलन करून महामार्गावरील वहातुक रोखून धरू असा इशारा खिडूकपाडा सर्वपक्षिय समितीच्या वतीने प्रभाकर उलवेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दीला.