तामसई येथेे पोेपटी कवी संमेलन

  तामसई येथेे पोेपटी कवी संमेलन



 पनवेल(प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक,कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पनवेल तालुक्यातील तामसई (दुंदरे) येथे पोेपटी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
     हिरवागार निसर्ग आणि सोबतीला हवाहवासा वाटणारा गारवा.कवितांचा आस्वाद घेताना पोपटीची चव चाखण्याचा आनंद अवर्णनीय असतो. असाच आनंद देणारे रायगडच्या मातीतल्या पोपटी कवी संमेलनाला अनेक वर्षांची परंपरा आहे. याही वर्षी या पोपटी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  
          या पोपटी कवी संमेलनाला  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे, नाट्य निर्माता विनोद नाखवा, कोमसापचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, कोमसापचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, कोमसाप नवीन पनवेल शाखेचेे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित राहणार आहेत.  हे पोपटी कवी संमेलन नि:शुल्क असून या कविसंमेलनास कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ यांनी केले आहे.
Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image