2021 मध्ये पनवेल तालुक्यात सापडले 178 कुष्ठरुग्ण

 2021 मध्ये पनवेल तालुक्यात सापडले 178 कुष्ठरुग्ण

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः कुष्ठरुग्ण इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान आणि योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. 2021 मध्ये पनवेल तालुक्यात 178 कुष्ठरुग्ण सापडले आहेत. यातील 91 रुग्ण बरे झालेले असून 64 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

2020 मध्ये पनवेल तालुक्यात 187 कुष्ठरुग्ण सापडले होते. कुष्ठरोग निर्मूलनाबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत गेल्यामुळे जनतेचा कुष्ठरोगी व्यक्तीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात हळुहळू फरक पडत आहे. मात्र, कुष्ठरोग रोग सर्वसामान्य आहे. समाजाने वुष्ठपिडीत व्यक्तींना स्वीकारावे याबद्दलची मानसिकता बदलण्यास काही काळ जावा लागेल. कुष्ठरोग सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता-पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. त्वचेवर न खाजणारा आणि बधिर चट्टा आल्यास किंवा हातापायास मुंग्या, बधिरपणा आल्यास किंवा त्वचा लालसर चमकदार दिसू लागल्यास ताबडतोब तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. रोगाचे निदान झाले तरी घाबरण्याचे कारण नसते. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image