भारतीय रिज़र्व्ह बँकेतर्फे 14 मार्च रोजी उद्योजकांसाठी बैठक
अलिबाग,दि.11 (जिमाका):- जिल्ह्यामधील सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी भारतीय रिज़र्व बँक (मुंबई) वित्तीय समावेश आणि विकास विभागातर्फे दि.14 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता हॉटेल सिसॉम, पेण बायपास येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय रिज़र्व्ह बँक वित्तीय समावेश आणि विकास विभाग, तहसिलदार, आरसेटी, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड जिल्हयातील सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत उद्योजकांना आपल्या सूचना, समस्या बँक अधिकाऱ्यांसमोर मांडून सोडवून घेता येणार आहे.
ही बैठक रायगड जिल्हयात प्रथमच होत असल्याने सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योजकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय रिजर्व्ह बँकेच्या जनरल मॅनेजर कल्पना मोरे यांनी केले आहे.