ITF लंडन व NMGKS संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन
इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन लंडन व श्री. महेंद्र घरत अध्यक्ष असलेली NMGKS संघटना नेहमीच सर्वसामान्य कामगारांतून नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत असते. वर्षातून तीन ते चार वेळा विविध ठिकाणी या नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. दिनांक १२ व १३ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रमसाफल्य भवन खंडाळा,येथे हि कार्यशाळा संपन्न झाली. कामगारांचे मुलभूत अधिकार काय असतात? संघटना म्हणजे काय? ITF सारख्या बाहेर देशातील संघटना कोणत्या प्रकारे काम करतात? कामगारांना संघटनेची गरज काय? या विषयी या शिबिरात मार्गदर्शन केले जाते. यामुळे कामगारांमध्ये जागरूकता येऊन आपण आपल्या हक्कांसाठी कसे लढले पाहिजे हि जाणीव निर्माण होते.
या कार्यशाळे प्रसंगी दोन दिग्गज कामगार नेते श्री. महेंद्रजी घरत व श्री. सचिनभाऊ अहीर उपस्थित राहून कामगारांना अनमोल मार्गदर्शन केले. तसेच मनिबेन कारा इन्स्टीट्युटचे चेअरमन श्री. राजेंद्र गिरी (मुंबई ), पि. के. रमण, वैभव पाटील यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या शिबिरासाठी न्यु मॅरीटाइम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे विविध कंपन्यांतून १४ महिला कामगार सभासद तर १७ पुरुष कामगार सभासद उपस्थित होते.