भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी रायगड जिल्हा आयोजित प्रथम काव्य संमेलन उत्साहात संपन्न... !

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी रायगड जिल्हा आयोजित प्रथम काव्य संमेलन उत्साहात  संपन्न... !


सचिन पाटील (अलिबाग)-देशभरातील नवोदित कवी, लेखकांची एकजूट बांधण्याचा हेतू मनाशी बाळगून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ही संस्था नेहमीच कार्यरत असते. याचाच प्रत्यय संस्थेच्या रायगड जिल्हा आयोजित प्रथम ऑनलाईन काव्य संमेलनाच्या माध्यमातून देखील आला. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा आम्रपाली घाडगे संमेलनाध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. संमेलनाचे सूत्रसंचालन सौ.वीणा पाटील व सौ.वैशाली साळुंखे यांनी केले.आणि प्रास्ताविक सौ.साळुंखे यांनी दिले. तसेच सचिन पाटील यांनी आभार मानले.

           शनिवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी च्या रायगड जिल्हा प्रशासक सौ. वीणा पाटील आणि सहप्रशासक श्री. सचिन पाटील यांच्यावतीने ऑनलाईन काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. नवोदित कवींना काव्यलेखना सोबतच काव्य सादरीकरणाचा अनुभव देखील मिळाला पाहिजे हा उद्देश ठेवून सदर काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर काव्यसंमेलनात उपस्थित कवी, कवयित्रींनी मनाचा ठाव घेणाऱ्या विविध विषयांवर आणि कौतुकास्पद काव्यरचना सादर केल्या.

           रायगड जिल्हा प्रशासक सौ.वीणा पाटील व सहप्रशासक यांच्या वतीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या काव्यसंमेलनाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल सिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा आम्रपाली घाडगे, महिला अध्यक्षा शिल्पा मुसळे, सिध्दार्थ आंबेकर आणि इतर सर्व पदाधिका-यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.