शेकापचे वाजुभाई सादराणि यांचे निधन
पनवेल (प्रतिनिधी)- पक्ष कार्यालयात रोज हजेरी लावणारा शेकापक्षाचा निष्ठावंत मावळा हरपला. आता कुठल्याही कार्यक्रमात व पार्टी आँफिसला हरी ओम नामाचा गजर थांबला..वजुभाई आपल्या कडुन पनवेल नगरपालिका व विधानसभा हद्दीतील खुप काही किस्से ऐकायला मिळाले व मिळत होते परंतु आज ही दुःखद बातमी ऐकून कुठेतरी काळजाला धक्का बसला.. एक जेष्ठ आणि वयाच्या ७० मध्ये सुद्धा पक्षाविषयी व संघटनेविषयी आणि अगदी नेत्यांच्या विषयी आदर करणारे व नेहमी विचारपूस करणारे आमचे जेष्ठ मार्गदर्शक आज आपल्या सर्वांच्या मधून निघून गेले आहेत त्यांच्या जाण्याने शेकापक्षाचा पुरोगामी विचारांचा प्रसार आणि प्रचार थांबला..