मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचा बैठकीत निर्णय

मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचा बैठकीत निर्णय


पनवेल दि.२० (वार्ताहर)- सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी 20 रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली. मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे 26 तारखेपासून आझाद मैदानावर  आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव राजेंना पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार आहेत. आज झालेल्या मिटिंग मध्ये सर्व समन्वयकानी सरकार वर रोष व्यक्त केला. गेल्या 2 वर्षांपासून राजे समाजाच्या प्रमुख 7/8 मागण्या संदर्भात आंदोलन करीत आहेत तरी पण मुख्यमंत्री फक्त आश्वासन देत आहेत पण प्रश्न सोडवत नाहीत म्हणून राजेंना आमरण उपोषण करावे लागत आहे हि बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. आता तरी राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य करून अंमलबजावणी नाही केली तर या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे सर्व समन्वयकानी भूमिका व्यक्त केली. आणि रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने छत्रपती संभाजीराजे सोबत राहणार असा निर्धार करण्यात आला या मीटिंगला राज्य समन्वयक विनोद साबळे , मारुती पाटील , संतोष पवार , मंगेश दळवी , हरीश बेकावडे , प्रदीप देशमुख , नरेश सावंत , प्रवीण बैकर , अमित यादव या सह अनेक समन्वयक सहभागी झाले होते