उलवे नोडमधील हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी ) पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष आणि उलवे नोड २ महिला मोर्चा कमिटीतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी झाला या समारंभाचे भाजप नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले.