पत्रकार सय्यद अकबर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पत्रकार सय्यद अकबर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा-पनवेल तालुक्यातील पत्रकारांसह मान्यवरांची उपस्थिती


प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे सय्यद अकबर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


पनवेल /वार्ताहर

  क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड प्रभारी सय्यद अकबर यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील पत्रकार तसेच विविध स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माहिती विभागाचे संचालक दयानंद कांबळे,माहिती जनसंपर्क कोकण विभाग उपसंचालक डॉ.गणेश मुळे  व माहिती जनसंपर्क कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी पुष्पगुच्छ देऊन सय्यद अकबर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एक उत्तम वक्ते, कणखर नेतृत्व, दिलदार व्यक्तिमत्त्व व अल्पसंख्यांकांचे नेते म्हणून सय्यद अकबर यांची समाजात विशेष ओळख आहे.सर्वांना सोबत घेऊन भेदभाव न करता दिलखुलास वागण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे असे मत डॉक्टर गणेश मुळे यांनी यावेळी मांडले.

  यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार विजय कडू, पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, मंदार दोंदे, क्रियाशील प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष साहिल रेळकर, उपाध्यक्ष क्षितिज कडू, सचिव चंद्रकांत शिर्के, कोषाध्यक्ष विशाल सावंत, सहसचिव असीम शेख, जेष्ठ पत्रकार किरण बाथम, अनिल राय, साबीर शेख, जसपाल सिंग, इरफान शेख, इस्माईल तांबोळी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी क्रियाशील प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image