“समान संधी केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा."- समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे

                                                       

“समान संधी केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा."- समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे

     *अलिबाग,दि.21(जिमाका):-* समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी व्यासपीठ निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी "समान संधी केंद्र या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी केले.

     दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी बेलापूर येथील भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजमध्ये समान संधी केंद्राचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ.विलासराव कदम, संचालक, भारती विद्यापीठ, प्राचार्य डॉ.अंजली कळसे, श्री.अरुण माने, श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग व श्री.बलभिम शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे हे उपस्थित होते.

     राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेवून, महाविद्यालयातच समान संधी केंद्र हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय नुकताच सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. सदर समान संधी केंद्रात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहीत करणे, रोजगार प्राप्ती किंवा उद्योगजगता व व्यावसायिक होण्यासाठी कोशल्य शिक्षण याबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.



Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
पक्षी सप्ताह २०२५ निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचर फॉन सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर,उरण–रायगड (महाराष्ट्र) तर्फे व्याख्यान
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image