खांदेश्वर बंगाली असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
पनवेल (प्रतिनिधी)- आज दिनांक २७/०२/२०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे,व युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरिष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली *खांदेश्वर बंगाली असोसिएशनचे* अध्यक्ष अशिम कुमार सिन्हा देव, सचिव प्रदीप दत्ता, उपसचिव श्यामलाल हिरा, सर्व उपाध्यक्ष, सदस्य, ज्येष्ठ सदस्य, प्रमुख महिला पदाधिकारी यांच्यासह साडेतीनशे महिला व पुरुष पदाधिकारी यांनी भाजपला रामराम करून *शिवसेना पक्षात* जाहीर प्रवेश केला आहे, हा *पक्षप्रवेश* खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्या अथक प्रयत्नाने जाहीर पक्ष प्रवेश केला.
तसेच आज *मराठी राजभाषा दिवस* निमित्त शिवसेना युवासेना आयोजित *माझी स्वाक्षरी अभियान* राबविण्यात आले त्यात जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी सहभाग दर्शविला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, महानगर संघटीका सौ.ऍड. शुभांगी शेलार, उपमहानगर संघटिका सौ. संचिता राणे, खांदा कॉलनी शहर संघटिका सौ. सानिका मोरे, नवीन पनवेल शहर संघटीका सौ. अपुर्वा प्रभू यांची आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी खांदा कॉलनी शहर शाखेतील नवनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार सुद्धा करण्यात आला. यामध्ये उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक शिवाजी दांगट व शहर समन्वयक गणेश परब यांचा सुद्धा खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी खांदा कॉलनी शहर शाखेतील सर्व उपशहरप्रमुख, शहर संघटक, उपशहर संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना व सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!