संतोषजी शर्मा यांचा वाढदिवस शिवजयंती उत्सव आणि स्वच्छता मोहीम राबवून साजरा

संतोषजी शर्मा यांचा वाढदिवस शिवजयंती उत्सव आणि स्वच्छता मोहीम राबवून साजरा   


                        

खारघर (प्रतिनिधी)-नमो नमो मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोषजी शर्मा यांचा वाढदिवस शिवजयंती उत्सव आणि स्वच्छता मोहीम राबवून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.शर्मा हे असे भाग्यवान आहेत की,शिवजयंतीदिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने तो कोणीही विसरत नाही.संपूर्ण जगात शिवजयंती  धुमधडाक्यात साजरी होत असतानाच  संतोष शर्मा यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.या वर्षी पनवेल महानगरपालिकेच्या सभापती आणि खारघर येथील प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका सौ.संजना कदम आणि समीर कदम या उभयतांनी सेक्टर-१५,१६,१७ व १८ मध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.याप्रसंगी संतोष शर्मा यांनी स्वच्छता दुतांच्याबरोबर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.                

        माननीय शर्मा यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर,त्यात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील  वडीलधारी,लहान-थोर समवयस्क आणि मित्रपरिवार,तसेच माध्यम जगतातील नामांकीत मित्र त्यामध्ये लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब,भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष व  त्यांचे राजकीय गुरू सन्माननिय आमदार प्रशांतजी ठाकूर,कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष सन्माननिय बाळासाहेब पाटीलजी,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननिय विक्रांतजी पाटील,पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशजी ठाकूर आणी पनवेल महानगरपालिकेच्या उप-महापौर सौ.सिताताई पाटील,भारतीय जनता पार्टी खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रीजेश पटेल,सरचिटणीस दिपक शिंदे ,उद्योग आघाडी सेलचे मामा मांजरेकर,सोशल मीडीया सेलचे अजय माळी संदीप कासार तसेच रायगड भाजपा सरचिटणीस गीता चौधरी आणि खारघर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा दील्या आहेत.

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image