अत्याधुनिक सोयींयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांसाठी सोईयुक्त - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) अत्याधुनिक सोईयुक्त असे एसआरएल डायनॉस्टीक सेंटर हे पनवेलकरांच्या सेवेसाठी आज पासून सुरु झाले आहे. या उदघाटना निमित्त त्यांनी सर्वांसाठी मोफत, रक्ततपासणी व मोफत नेत्र तपासणी हा उपक्रम राबवत आहेत हे कौतुकस्पद असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उदघटना प्रसंगी केले.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, डॉक्टर माला झाला, रविकांत झाला, डॉ.निलेश बांठीया, एसएलआरचे अंकित कुमार सिंग, अनिकेत मोहिते, निलेश कोळी, सचिन नाफाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सदर सेंटर हे शॉप नं.8, प्लॉट नं.123, गुरुकृपा अपार्टमेंट, एमटीएनएल समोर, मिडलक्लास हौसिंग सोसायटी पनवेल येथे आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या रक्त तपासणी, त्यामध्ये प्रामुख्याने मलमुत्र तपासणी तसेच इतर तपासणी व चाचण्या माफक दरात या ठिकाणी केल्या जाणार आहेत. यानिमित्ताने रविवार दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत मोफत रक्त तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन विविध मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. याचा लाभ पनवेलकरांनी घ्यावा असे आवाहन लॅब डायरेक्टर जसोल सुभाषचंद्र बांठीया भ्रमणध्वनी 8828882626 यांनी केले आहे.