रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेस उत्तम प्रतिसाद




उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )
 मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा, मराठी भाषेविषयी प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी, मराठी भाषा दैनंदिन व्यवहारात, आचरणात आणली जावी, या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था व रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असल्याची माहिती श्री.सुधीर मुंबईकर यांनी दिली.
      श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला जनतेचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभत असतो. 
      रायगड जिल्हा माहिती कार्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित केलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्यालय, कोप्रोली चौक, कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.    
       यावेळी सुधीर मुंबईकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमाचे कौतुक करीत मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
      श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्यालय,कोप्रोली चौक, कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी केली. यावेळी निबंध स्पर्धा आयोजित करण्याची भूमिका, हेतू सुदेश पाटील यांनी स्पष्ट करून सांगितली.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सुधीर मुंबईकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदन म्हात्रे, माधव म्हात्रे उपस्थित होते. 
    यावेळी उपस्थित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
      या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- प्रथम गटात (5 वी ते 7 वी )-प्रथम क्रमांक -मनस्वी मांजरेकर(रोहा ), दुसरा क्रमांक प्रबोध शिर्के (माणगाव ), तिसरा क्रमांक -दिग्गज फडके (सिंधूदुर्ग ), उत्तेजनार्थ -आराध्य शिंदे (कोल्हापूर ), हर्षा ठाकूर (पेण ), दुसरा गट (8 वी ते 10 वी )-प्रथम क्रमांक -सिद्धी गायकवाड (नवीन पनवेल ),द्वितीय -प्रीती निकाळजे (उरण ), तृतीय -तीर्थ राऊत (खारघर ), उत्तेजनार्थ -प्रीती गोडसे (नवीन पनवेल ), शुभम चिकणे (तुर्भे -नवी मुंबई ), तिसरा गटामध्ये (11 वी ते 12 वी )-प्रथम क्रमांक -गायत्री गिरप (रोहा ), द्वितीय -श्रेया पाबरेकर (रोहा ), तृतीय -गोडसे अवंतिका पोपट (नवीन पनवेल ), उत्तेजनार्थ -सोनाली वाघरे (मुरुड), पायल पवार (उरण ), चौथ्या गटामध्ये (13 वी ते 15 वी )-प्रथम क्रमांक -सिद्धी पाटील (कोल्हापूर ), द्वितीय -साहिल म्हात्रे (उरण ), तृतीय -स्वीटी चिकणे (तुर्भे-नवी मुंबई ),उत्तेजनार्थ दिक्षा चेरकर (अलिबाग ), प्रार्थी म्हात्रे (पेण ), पाचव्या गटामध्ये (खुला गट )-प्रथम क्रमांक -पूर्वा सावंत (पनवेल), द्वितीय -किशोर म्हात्रे (उरण), तृतीय -स्नेहा सोरटे (पेण), उत्तेजनार्थ -सायराबानू चौगुले (माणगाव), प्रेरणा चौलकर (मुरुड जंजिरा), राजेंद्र अंबीके( सुधागड). 
      जे विजेते स्पर्धक बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित नव्हते, त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र कुरियरने घरपोच पाठविले जाणार आहे. बक्षीस वितरण केल्यानंतर स्पर्धकांनी सदर स्पर्धेचे उत्तम प्रकारे आयोजन केल्याने आयोजकांचे आभार मानले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक यांनी तर आभार प्रदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.     
     यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.