लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी
आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये भारताला मिळवून दिला प्रथम क्रमांक
पनवेल(प्रतिनिधी) कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या 'लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (सिबीएसई ) च्या विदयार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दिला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे (सीबीएसई) च्या प्राचार्या अर्चना खाडे- चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक इंग्लिश स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, रायगड विभाग पीआरओ बाळासाहेब कारंडे, क्रीडा शिक्षक सुरज पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून कु. सिद्धार्थ मिश्रा (इ. ७ वीं) व कु. ओम झावरे (इ. ७ वी) हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना क्रीडा शिक्षक सुरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ रोजी नेपाळ येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान या ४ देशांचा समावेश होता. यात प्रत्येक देशाचे निवड झालेले १२ खेळाडूनी त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व केले.