खारघर सेक्टर-१५ मध्ये शिवसेना शहर प्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकाराने गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न

खारघर सेक्टर-१५ मध्ये शिवसेना शहर प्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकाराने गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न



खारघर (प्रतिनिधी)- खारघर शिवसेना शहर प्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकाराने १४४ व्या "गजानन महाराज"प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन सेक्टर-१५ मध्ये  करण्यात आले होते.गजानन महाराज यांचा १४४ वा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायण महापूजा ठेवून महाप्रसाद ठेवण्यात आला होता, यावेळी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ परिसरातील असंख्य नागरिकांनी घेतला.                              याप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि गुरूनाथ पाटील तसेच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी,शिवसैनिकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला.