श्री साई मंदीर कळंबोली सर्कलचा तीसरा वर्धापन दिन संपन्न
कळंबोली (प्रतिनिधी)-राहुल रमेश पाटील संचालित,"श्री.साई मंदीर कळंबोली सर्कल"या मंडळाचा तीसरा वर्धापन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त मंडळाने,रोटरी ब्लड बँक खांदा काॕलनी यांच्या सहकार्याने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते."रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान"या घोषवाक्याने प्रेरीत होऊन या ठीकाणी पनवेल परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचबरोबर या मंडळाच्या वतीने साई भंडाऱ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.या भंडाऱ्याच्या महाप्रसादाचा लाभ शेकडो साई-भक्तांनी घेतला.
यावेळी पनवेल,खांदा काॕलनी,कळंबोली,कामोठा,खारघर,नावडा-तळोजा या नोडमधून तसेच पनवेलच्या ग्रामीण परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने साई मंदीरच्या तीसऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.त्याचबरोबर या परिसरातीत अनेक सर्वपक्षिय मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या कार्यक्रमास आपली उपस्थिती नोंदविली.सर्व उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने अध्यक्ष सन्माननिय राहुल पाटील यांनी शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सिंहाचा वाटा उचलला,त्यामध्ये गौतम जाधव,भाऊ कांबळे,मिथून पाटील,जितु पाटील,विराज पावशे,प्रविण बाथम,अवि तांबे,प्रशांत कांबळे,अनिल नाईक आणि मंगेश मुडकर यांचा तसेच,"रोटरी ब्लड बँक,खांदा काॕलनीचे"डाॕ.प्रकाश दिवे व मुख्य टेक्निशियन मंगेश देशपांडे यांच्या नावांचा खास उल्लेख करावा लागेल.