गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष;गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वेफाटक येथे सब – वे पुल बांधण्याची अभिजीत पाटील यांची मागणी

गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष;गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वेफाटक येथे सब – वे पुल बांधण्याची अभिजीत पाटील यांची मागणी


रायगड जिल्ह्यातील धावणाऱ्या कोकण रेल्वेवर पनवेल ते पेण दरम्यान असलेल्या गुळसुंदे – आकुलवाडी रेल्वे फाटक येथे सब – वे पुल बांधण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वे चे झेड.आर.यू.सी.सी. सदस्य अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर मध्य रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      याबाबत अभिजीत पाटील यांनी जनरल मॅनेजर, मध्य रेल्वे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "' ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे ता. पनवेल यांनी दिनांक ०१/१०/२०१८ रोजी वरील विषयासंदर्भात अर्ज केला होता परंतु या विषयावर प्रशासनाकडुन लक्ष दिले जात नाही.

       तसेच इतर रेल्वेफाटकाचे गेट रेल्वे पास झाल्यानंतर लगेचच २ ते ३ मिनीटात उघडतात. परंतु गुळसुंदे-आकुलवाडी रेल्वेफाटकाचे गेट जवळजवळ २० ते २२ मिनिटे बंद असतो. रेल्वे, पोसरी रेल्वे स्टेशन तसेच आपटा रेल्वे स्टेशन पास झाल्यानंतरच सदर रेल्वेफाटकाचे गेट उघडले जाते त्यामुळे कामावर जाणारे आजारी व्यक्ती / रूग्णवाहीका, गरोदर महिला विद्यार्थी, मोळी विकायला जाणा-या अदिवासी महिला यांना खुप वेळ ताटकळत उभे रहावे लागते. परिणामी कामगारांना वेळेत कामावर हजर होता येत नाही, आजारी व्यक्तीना वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. अशा अनेक समस्या निर्माण होतात.

    सदर बाबतीत आपण तातडीने लक्ष दयावे व लवकरात लवकर सब-वे पूल बांधण्यात यावा. तसेच सब-वे पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत उपरोक्त रेल्वे फाटक अद्ययावत करून उघडण्याचा वेळ कमीत कमी करावा."' अशी मागणी अभिजीत पांडुरंग पाटील, झेड.आर.यू.सी.सी. सदस्य, मध्य रेल्वे यांनी केली आहे.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image