पनवेलमध्ये रंगला रंगछटा 2022 चा दिमाखदार सोहळा-ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची विशेष उपस्थिती

पनवेलमध्ये रंगला रंगछटा 2022 चा दिमाखदार सोहळा-ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची विशेष उपस्थिती



     पनवेल :  पनवेल येथे दि16/02/2022 रोजी चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि रिफ्लेक्शन थिएटर, पनवेल आयोजित रंगछटा 2022 एकपात्री व द्वीपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते तथा जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे उपस्थित होते. तसेच स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी व मार्गदर्शन देण्यासाठी मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ रंगकर्मी, सिनेअभिनेते जयंत सावरकर हेही उपस्थित होते. प्रथम सत्रात नटराज पूजन व दीपप्रज्वलन याने सुरुवात करून प्रितम म्हात्रे व जयंत सावरकर यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये एकूण ४५ स्पर्धकांनी भाग घेतला होता व या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक म्हणजेच विनय जोशी व मनोहर लिमये यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेमध्ये एकूण १६ बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सिनेअभिनेते जयंत भालेकर, सिनेअभिनेते शेखर फडके, लेखक सिद्धार्थ साळवी, सिनेअभिनेते विजय पवार, स्वराज्य चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक विहार घाग व बाल नाट्य निर्माते गायधनी हे सुद्धा उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. रंगछटा 2022 या स्पर्धेचे एकपात्री अभिनय स्पर्धेचे प्रथम पारितोषिक स्वप्नील साळवी, द्वितीय पारितोषिक परेश राजश्री, तृतीय पारितोषिक स्वप्नील रसाळ, उत्तेजनार्थ ऋतुजा, अजिंक्य टेकाले, शिवदास कुमटे, कल्याणी म्हात्रे, वैष्णवी पाटील व लक्षवेधी एकपात्री सिद्धी पवार यांना देण्यात आले. द्विपात्री अभिनय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अक्षता साळवी व रसिका पवार, द्वितीय पारितोषिक स्वप्निल बनकर, सिद्धेश शिंदे व तृतीय पारितोषिक यश खाडे, ग्रंथा घाग, उत्तेजनार्थ आंचल जैन, सिद्धेश शिंदे, स्वप्नील बनकर, ग्रंथा घाग, द्विपात्री विनोदी अक्षता साळवी द्वीपात्री लक्षवेधी दिया राणे यांना देण्यात आले.

या कार्यक्रमाला शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, गझलकार ए. के.शेख, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी,  नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकार, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, मा.नगरसेवक डी. पी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता ठक्कर, युवक संघटना अध्यक्ष देवेंद्र पाटील, अनिल बंडगर, पत्रकार मंदार दोंदे, सोनवणे सर, डी. एन यादव, किरण घरत, संजय कदम, विजय पवार, हरीश मोकल, संदेश मोहन, मंगेश अपराज, योगेश कोठेकर, रोहन गावंड, वैभव जोशी, सिद्धांत साखरे, पंकज वाघ, नाना रणदिवे, वरून महागावकर तसेच पत्रकार बंधू भगिनी व प्रेक्षक उपस्थित होते.
       पनवेल-उरण मधील कलाप्रेमींसाठी ही एक सुरुवात आहे या पुढेही असे उपक्रम आम्ही जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत , जेणेकरून पनवेल उरण मधील तरुणांना एक व्यासपीठ त्यांच्याच विभागात उपलब्ध होईल अशी आमची अपेक्षा आहे हे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे म्हणाले.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image