पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या समाजरत्न पुरस्काराने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सन्मानित
पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव विशाल सावंत, सल्लागार दीपक महाडिक, अॅड. मनोहर सचदेव हे यावेळी उपस्थित होते.