बेलपाडा येथील कोंक्रीट रस्त्याचे प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : गव्हाण जिल्ह्यापरिषद सदस्य रविंद्र पाटील यांच्या निधीतून आणि ग्रामपंचायत सदस्य शिल्पा किरण कडु यांच्या पाठपुराव्यामुळे बेलपाडा येथील स्मशानभूमी ते वलडेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन पनवेल महानगर पालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडले.