गौरव जहागीरदार यांची पनवेल प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी निवड

गौरव जहागीरदार यांची पनवेल प्रेस क्लबच्या उपाध्यक्षपदी निवड 


पनवेल (प्रतिनिधि) १० जानेवारी: पनवेल प्रेस क्लबची १७ वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली, या सभेत सर्व सदस्यांनी एक मताने संतोष घरत यांची अध्यक्षपदी नेमणूक केली आणि उपाध्यक्षपदी गौरव जहागीरदार, सचिवपदी देविदास गायकवाड,सह सचिव सुनील पाटील , खजिनदारपदी शैलेंद्र चवान यांची नेमणूक करण्यात आली आहे.

.     या प्रसंगी अध्यक्ष संतोष घरत यांनी सांगितले की, "संस्था आणि सभासंदासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहे, त्यानुसार पत्रकार भवन आणि  पत्रकारांसाठी सदनिका बांधण्याचा व इतर योजना राबवणार आहे. तसेच उपाध्यक्ष गौरव जहागीरदार यांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या "

      गौरव जहागीरदार यांच अभिनंदन करतांना देवीदास गायकवाड़ सचिव पनवेल प्रेस क्लब म्हणाले की, गौरव जहागीरदार हे एक आक्रमक पत्रकार असून त्याच्या लेखनीला सयमाची विशिष्ट धार आहे. त्यांच स्पष्ट व्यक्तिमत्व आणि लिखांण नेहमीच समाजाला योग्य मार्गदर्शक ठरत. महत्वाच म्हणजे आपत्कालीन करोना काळात त्यांनी अहोरात्र केलेल कार्य सरकारला मद्तपर, तसच कौतुकास्पद होत. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की गौरव जहागीरदार, त्यांना सोपविलेले उपाध्यक्षपद आपल्या कर्तुत्वाने सार्थकी लावून "पनवेल प्रेस क्लबचे" नाव फक्त रायगड जिल्ह्यातच नव्हे अखंड  महाराष्ट्रात  प्रसिद्ध करतील ह्याची आम्हाला खात्री आहे."  

     तर आपल्या उपाध्यक्षपद निवडी केल्याबद्द्ल धन्यवाद व्यक्त करताना, गौरव जहागीरदार म्हणाले की, सर्वप्रथम सगळ्या सदस्यांचे आणि अध्यक्ष संतोष घरत, यांचे मी आभार व्यक्त करतो.  हे पद नसून माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आणि  माझ्या आतापर्यंतच्या कर्तृत्वाला अजोड़ आव्हान आहे. मी आज हे जाहिर  करतो की, माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन, वेगवेगळे वैशिष्टपूर्ण उपक्रम राबवून  "पनवेल प्रेस क्लबचे" नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन, ह्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मिळेलच ह्याची मला १००% खात्री आहे.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image